हळर्ण, कासारवर्णे व चांदेल-हंसापूर या पंचायतींसाठीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने ९ डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीचे अर्ज १२ नोव्हेंबरपासून २० नोव्हेंबरपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. १३ व १८ रोजी सार्वजनिक सुटी असल्याने त्या दिवशी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
२१ रोजी अर्जांची छाननी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख २२ नोव्हेंबर असेल. पेडणे मामलेदारांची निर्वाचन अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.