लाडली लक्ष्मीच्या लाभार्थींना आर्थिक मदत ः मुख्यमंत्री

0
62

राज्य सरकारच्या लाडली लक्ष्मी योजनेअंतर्गत वर्ष २०१७ मध्ये अर्ज केलेल्या सुमारे ३ हजार लाभार्थींना चालू महिन्यात प्रत्येकी एक लाख रूपयांचे मानधन वितरित केले जाणार आहे. या योजनेसाठी २०१८ मध्ये अर्ज केलेल्या लाभार्थींना जुलै महिन्यात आणि २०१९ मध्ये अर्ज केलेल्या लाभार्थींना ऑगस्ट महिन्यात मानधन वितरित केले जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल पत्रकारांशी बोलताना दिली.

सरकारच्या विविध योजना नागरिकांपर्यत पोचविण्यावर भर दिला जाणार आहे. राष्ट्रीय संघटनमंत्री संतोष आणि गोवा प्रभारी रवी यांनी वैयक्तिक, सामूहिक पातळीवर भाजप कार्यकत्यांशी चर्चा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

विधानसभा निवडणूक माझ्या नेतृत्वाखाली
भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी आगामी २०२२ मध्ये होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर संघटन बांधणीसाठी मंत्री, आमदार, पदाधिकारी यांच्याशी चर्चा झाली आहे. आगामी विधानसभा निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढवली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.