लस महोत्सवाच्या पहिल्या दिवशी राज्यात २५०९ जणांचे लसीकरण

0
103

राज्यातील लस उत्सवाच्या दुसर्‍या टप्प्यात पहिल्या दिवशी ३४ पंचायत आणि नगरपालिका क्षेत्रात २५०९ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

लसीकरणाला गती देण्यासाठी पुन्हा एकदा लस महोत्सवाला काल बुधवार दि. २६ मेपासून हा लस उत्सव राज्यातील १६८ पंचायत आणि नगरपालिका क्षेत्रात राबविण्यात येणार आहे.

या लस उत्सवाच्या पहिल्याच दिवशी ३४ पंचायत व नगरपालिका क्षेत्रांत २५०९ नागरिकांना लशीचा पहिला डोस देण्यात आला. पेडणे तालुक्यातील आगरवाडा चोपडे पंचायत क्षेत्रात सर्वाधिक ३०७ नागरिकांना लस देण्यात आली आहे. कुळे पंचायतीमध्ये २०० नागरिकांना लस देण्यात आली आहे. सासष्टी तालुक्यातील माकाझन पंचायत क्षेत्रात सर्वांत कमी १७ नागरिकांना लस देण्यात आली आहे.
या लस महोत्सवाचे आठ दिवस विविध ठिकाणी आयोजन केले जाणार आहे. राज्यात ४५ वर्षांवरील वयोगटातील नागरिकांना लस देण्यावर भर दिला जात आहे. या लस महोत्सवात केवळ पहिला डोस देण्यास प्राधान्य दिले जात आहे.
राज्यात आत्तापर्यंत ९५ हजार ८८६ नागरिकांना लशींचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर, ३ लाख ९२३ नागरिकांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे.