कोरोना बळींची संख्या अडीच हजारांजवळ

0
123

>> बुधवारी ३९ मृत्यू, एकूण बाधित दीड लाखांवर

राज्यात कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यूसत्र सुरूच असून चोवीस तासांत आणखी ३९ रुग्णांचा बळी गेला आहे. कोरोना बळींची संख्या अडीच हजारांच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली असून कोरोना रुग्णांच्या एकूण बळींची संख्या २४९९ एवढी झाली आहे. तर, नव्या १४८७ रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येने दीड लाखांचा टप्पा ओलांडला असून कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५० हजार ८९७ एवढी झाली आहे. सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १५ हजार ७९१ झाली आहे.

राज्यातील आणखी १३६३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३२.२२ टक्के एवढे झाले आहे. चोवीस तासांत इस्पितळांमधून १३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

चोवीस तासांत पुन्हा ३९ बळी
राज्यात मे महिन्यात आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. चोवीस तासांत आणखी ३९ रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील कोरोना बळींची संख्या अडीच हजारांवर येऊन ठेवली आहे.

नवे १४८७ रुग्ण
राज्यात नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३२.२२ एवढे आहे. चोवीस तासांत नवे १४८७ बाधित रुग्ण आढळून आले आहेत. चोवीस तासांत नव्या ४६१५ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करून अहवाल जाहीर करण्यात आले आहेत. त्यातील ३५.३५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ५० हजार ८९७ झाली आहे.

२४ तासांत १६५ इस्पितळांत
गेल्या चोवीस तासांत नव्या १६५ रुग्णांना इस्पितळांत दाखल करण्यात आले आहेत. राज्यात इस्पितळांत दाखल करण्यात येणार्‍या रुग्णांच्या संख्येचे प्रमाण थोडे कमी झाले आहे.

१३६३ जण कोरोनामुक्त
राज्यात कोरोना बाधेतून बरे होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. राज्यातील कोरोनाबाधित आणखी १३६३ रुग्ण काल बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीतही वाढ झाली आहे. बर्‍या झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ३२ हजार ६०७ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.८८ टक्के एवढे आहे. नवीन १३२२ रुग्णांनी ‘होम आयसोलेशन’चा पर्याय स्वीकारला आहे.

१७ वर्षांखालील १६ हजार बाधित
राज्यात कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या दोन्ही लाटांमध्ये बाधित झालेली एकूण रुग्णसंख्या दीड लाखांवर पोहोचली आहे. यात ० ते १७ वर्षांखालील जवळजवळ १७ हजार जण बाधित झाले आहेत.१७ वर्षांखालील कोरोनाबाधितांची संख्या १६,२४६ एवढी असल्याची माहिती बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळातून देण्यात आली. कोरोनाच्या दोन्ही लाटांमध्ये ११.४० टक्के मुले बाधित झाली आहेत.