लष्करी अधिकार्‍याचे अपहरण करून हत्या

0
91

>> अज्ञात दहशतवाद्यांचे कृत्य

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यातील एका विवाह समारंभात सहभागी झालेल्या एका लष्करी अधिकार्‍याचे दहशतवाद्यांनी
मंगळवारी अपहरण करून नंतर त्याची हत्या केली. लेफ्टनंट उमर ङ्गैयाज हे मंगळवारी रात्री त्यांच्या एका नातेवाईकाच्या घरी विवाह समारंभास गेले असता सहा दहशतवाद्यांनी तेथून त्यांचे अपहरण केले. अपहरणानंतर काल सकाळी हरमैन या ठिकाणी त्यांचा मृतदेह बंदुकीच्या गोळ्यांनी छिनविछिन्न स्थितीत आढळला. अशी माहिती पोलिसांनी दिली. संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. कुलगाम जिल्ह्यातील असलेले लेफ्ट. ङ्गैयाज हे अखनूर विभागात तैनात होते. नातेवाईकाच्या विवाह समारंभानिमित्त ते सध्या रजेवर होते. अपहरणावेळी ते निःशस्त्र होते. ङ्गैय्याज यांच्या या हत्येच्या भ्याड कृतीचा बदला घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया लष्कराच्या एका निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. ङ्गैयाज गेल्या डिसेंबरमध्ये लष्करात रुजू झाले होते. लेफ्ट. ङ्गैयाज एक उमदे व आदर्श व्यक्तीमत्व होते. ते एक उत्कृष्ट क्रीडापटूही होते. असे संरक्षणमंत्री जेटली यांनी म्हटले आहे. ङ्गैयाज यांच्याकडून काश्मीरमधील युवकांना प्रेरणा मिळत राहील असेही ते म्हणाले.