लष्करी अधिकार्‍याची हत्या हिजबुल मुजाहिदीनकडून

0
64

भारतीय लष्करातील २२ वर्षीय लेफ्टनंट उमर ङ्गैयाज यांची हत्या हिजबुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेने घडवून आणल्याची
माहिती पोलिसांनी दिली. बुधवारी नातेवाईकांच्या विवाहास उपस्थित असताना निःशस्त्र ङ्गैयाज यांचे दहशतवाद्यांनी अपहरण करून नंतर हत्या केली होती.
ङ्गैयाज यांची हत्या काश्मीर पोलिसांच्या लुटून नेलेल्या एका रायङ्गलने करण्यात आल्याचेही सांगण्यात आले. शोपियान येथील एका सरकारी संकुलात असलेल्या पोलीस स्थानकावर दहशतवाद्यांनी अलीकडेच हल्ला केला होता. त्यावेळी पोलीस स्थानकातून दहशतवाद्यांनी रायङ्गली व दारूगोळा लुटला होता.
दक्षिण काश्मीरमधून पोलिसांच्या ताब्यातील ४० हून अधिक रायङ्गली गेल्या दहा महिन्यात दहशतवाद्यांनी पळविल्या आहेत. ङ्गैयाज यांच्या
हत्येमागे दहशत व घबराट माजविण्याचा हेतू असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, काश्मीरमधील सध्याच्या स्थितीमुळे चिंतीत असलेल्या केंद्राने काल केंद्रीय गृह सचिव राजीव महर्षी यांना काश्मीरला पाठविले. त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्री मेहबुवा मुङ्गती यांची भेट घेऊन राज्याविषयी केंद्राची चिंता त्यांच्याकडे व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.