महाराष्ट्रात आता दर रविवारी पेट्रोल पंप बंद

0
55

तेल कंपन्यां विरोधातील आपली भूमिका अधिक कडक बनविताना
महाराष्ट्रातील पेट्रोल पंप चालक संघटनेने आता येत्या १४ मे पासून दर दिवशी पेट्रोल पंप बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ‘पेट्रोल खरेदी नाही’ खाली एक दिवसाचे आंदोलन केल्यानंतरही तेल कंपन्यांनी पेट्रोल पंप चालकांना बोलण्यासाठी निमंत्रित न केल्याने पेट्रोलपंप चालकांनी संघर्षाची भूमिका घेतली आहे.
पेट्रोल पंप चालविण्यासाठी लागणारा खर्च व त्यांना दर सहा महिन्यांनी महागाई निर्देशांकानुसार वाढ देण्याचे लेखी आदेश केंद्र सरकारने तेल कंपन्यांना दिले होते. परंतु गेल्या चार वर्षांपासून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. कंपन्यांकडे त्याबाबत संपर्क साधूनही प्रतिसाद मिळाला नसल्याचे पेट्रोल पंप चालक संघटनेचे म्हणणे आहे.