विश्‍व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी रवींद्र सिंह

0
40

पद्मश्री पुरस्काराचे मानकरी रवींद्र नारायण सिंह यांची शनिवारी विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. मूळचे बिहारचे असलेले सिंह हे आतापर्यंत विहिंपचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहात होते. वैद्यकशास्त्रातील योगदानाबद्दल २०१० साली त्यांना ‘पद्मश्री’ हा नागरी पुरस्कार मिळाला होता. श्री. सिंह यांची अध्यक्षपदी निवड झाल्याची माहिती विहिंपचे सहसरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी दिली.