रॉय नाईकचा जामीन अर्ज निकाली

0
79

खाण घोटाळा प्रकरणी रॉय नाईक याच्या अटकेची गरज भासल्यास त्याला ४८ तास आधी अटकेची पूर्व कल्पना देण्यात येईल, असे एसआयटीने न्यायालयात स्पष्ट केले आहे. खाण घोटाळा प्रकरणाचा तपास करणार्‍या खास तपास पथकाने (एसआयटी) रॉय नाईक याला खाण घोटाळा प्रकरणी चौकशीसाठी एसआयटीच्या कार्यालयात हजर राहण्याचे समन्स जारी केले होते. त्यामुळे रॉय याने उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. जिल्हा न्यायालयाने दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर अटकपूर्व जामीन अर्ज निकालात काढला आहे.