रिया चक्रवर्तीची पुन्हा आठ तास चौकशी

0
302

अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणात अमली पदार्थविरोधी विभागाने काल रिया चक्रवर्ती हिची काल दुसर्‍यांदा आठ तास चौकशी केली. मात्र, तिला अटक करण्यात आलेली नाही. रिया हिला रविवारीही चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. दरम्यान, रिया हिने काल सुशांतची बहीण प्रियांका व इतरांविरुद्ध बोगस प्रिस्क्रिप्शन दिल्याप्रकरणी पोलीस तक्रार नोंदविली आहे.