रित्विज परबला बुद्धिबळाचे विजेतेपद

0
196

देसाई प्रतिष्ठानच्या सहाव्या लक्ष्मीकांत देसाई स्मृती अखिल भारतीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद रित्विज परब याने पटकावले. फोंडा तालुका बुद्धिबळ संघटनेने गोवा बुद्धिबळ संघटना व अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या सहकार्याने मंगेशी येथील वागळे हायस्कूलच्या सभागृहात या स्पर्धेचे आयोजन केले होते. प्रशांत जे. याने दुसरे तर सौरव खेर्डेकर याने तिसरे स्थान मिळविले. अभिषेक गिरी, दिमित्री बेझस्त्राखोव, नीलेश भंडारी, आयुष पेडणेकर, पार्थ साळवी, विवान बाळ्ळीकर, आर्यन रायकर, चिंकोळीमठ हलसागर, अस्मिता रे, श्‍वेता सहकारी, रईस खान, अर्णव खेर्डेकर, हेरंब भागवत, देवेश नाईक, यश उपाध्ये, प्रतीक बोरकर व ऋषिकेश परब यांनी अनुक्रमे चौथा ते विसावा क्रमांक मिळविला. बक्षीस वितरण समारंभाला देसाई प्रतिष्ठानचे विश्‍वस्त राजेंद्र देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. फोंडा तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष अमोघ नमशीकर, सचिव आनंद कुर्टीकर, खजिनदार महेश खेडेकर, स्पर्धा संयोजक सागर साकोर्डेकर, मुख्य लवाद अरविंद म्हामल उपस्थित होते. प्रमोद कामत, संदेश नाईक, अनिरुद्ध बोरकर, विल्सन क्रुझ, हर्षद भोसले, दिशा कुर्टीकर व गायत्री भोसले यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दिले. अर्चना तेंडुलकर यांनी सूत्रसंचालन केले. सागर साकोर्डेकर यांनी आभार मानले.
निकाल ः अव्वल चार खेळाडू ः रेटिंग १५००-१९९९ ः हर्मन साल्ढाणा, साईराज वेर्णेकर, गिरीश बाचीकर, अश्‍विन पी.जी., रेटिंग १०००-१४९९ ः श्रीलक्ष्मी कामत, अमेय शेट्टी, आकाश मादीवलार व अथर्व नारायण, बिगरमानांकित ः सक्षम नाटेकर, श्रेयस मनचंदा, अवनिश बोरकर, राहुल सहकारी, सर्वोत्तम महिला खेळाडू (१८ वर्षांवरील) ः साईनी देसाई, अव्वल पाच गोव्याचे खेळाडू ः साईरुद्र नागवेकर, इथन वाझ, अनिश नाईक, सचिन गावडे, सागर पेडणेकर, उत्तेजनार्थ बक्षिसे ः १५ वर्षांखालील ः साईश गावस, कौशिक पेडणेकर, अविरा कुर्टीकर, १३ वर्षांखालील ः साहील भट, वरद शिरोडकर, सयुरी नाईक, अवनी हेगडे, ११ वर्षांखालील ः अली अमानत, एड्रिक वाझ, शौर्य पेडणेकर, सानी गावस, ९ वर्षांखालील ः सर्वांग पागी, वेदांत आंगले, जेनिसा सिक्वेरा, तनाया डा सिल्वा, ७ वर्षांखालील ः साईराज नार्वेकर, श्‍लोक मेस्त, पूर्वी नायक व दिया सावळ, फोंडा तालुक्यातील सर्वोत्तम खेळाडू ः सिद्धीराज गावकर, संकेत शामकुवर, विश्‍वेश पै, राहुल भारद्वाज, शर्मद भट, विठ्ठल पै, योगेश पै बिर व पार्थ कामत.