तनिशाला मिश्र दुहेरीचे सुवर्ण

0
143

गोव्याच्या तनिशा क्रास्टोने ४४व्या कनिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेच्या मिश्र दुहेरी प्रकारात छत्तीसगडच्या ईशान भटनागरच्या साथीने खेळताना सुवर्णपदकाची कमाई केली. १९ वर्षांखालील मिश्र दुहेरी गटात त्यांनी अव्वल मानांकित नवनीत बोक्का व साहिती बंदी यांचा ३४ मिनिटांत २१-१८, २१-१३ असा पराभव केला. आंध्र प्रदेशमधील राजामुंद्री येथे ही स्पर्धा पार पडली.

कनिष्ठ महिलांच्या दुहेरीत मात्र तनिशा व तिची उत्तराखंडची जोडीदार अदिती भट्ट यांना शेवटचा अडथळा पार करता आला नाही. लखनौ येथील मागील मोसमात सुवर्ण जिंकलेल्या तनिशा- अदिती या अव्वल मानांकित जोडीला सिमरन सिंघी व रितिका ठाकेर यांच्याकडून १४-२१, २२-२०, १८-२१ असा पराभव स्वीकारावा लागला. हा सामना एक तास १७ मिनिटे चालला.