राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी २३० कोटींचा निधी मंजूर

0
96

गोव्यात नोव्हेंबर २०१८ मध्ये होणार्‍या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी २३० कोटी रूपये खर्चून साधन सुविधा उभारण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली सागची आमसभा काल घेण्यात आली. या बैठकीत २३० कोटी रूपये खर्चून साधन सुविधा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. साधनसुविधा उभारण्याचे काम १२ महिन्यात पूर्ण केले जाणार आहे.

कांपाल पणजी येथे टेबल टेनिस आणि बॅडमिंटन मैदाने उभारली जाणार आहेत. तसेच फातोर्डा मडगाव येथे टेबल टेनिस मैदान उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.