राय स्पोटर्‌‌स क्लब अंतिम आठांत

0
69

राय स्पोर्टिंग क्लबने पॅरिश यूथ नुवेचा टायब्रेकरवर ४-३ अशा गोलफरकाने पराभव करीत डॉन बॉस्को ओरेटरी फातोर्डा आयोजित १८व्या ब्र. इलालिओ वाझ स्मृती फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

डॉन बॉस्को ओरेटरीच्या मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यात दोन्ही संघांना पूर्ण वेळेत गोलकोंडी सोडविण्यात अपयश आले. त्यामुळे रेफ्रीने निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब केला. त्यात विजयी ठरलेल्या राय स्पोर्टिंग क्लबतर्फे डॅनियल गोम्स, विल्फ्रेड गोम्स, लॉयड कार्दोजो आणि एल्रॉय रॉड्रिगीज यांनी गोल नोंदविले. तर पराभूत पॅरिश यूथ क्लबतर्फे सीडीन कुलासो, जेरोस ओलिविएरा आणि शुबर्ट कुलासो यांनाच प्रतिस्पर्धी गोलरक्षकाला चकविता आले.