रामपाल समर्थकांची पोलिसांशी चकमक

0
87
रामपाल समर्थक व पोलीस यांच्यात काल उडालेल्या चकमकीचे दृश्य.

हरयाणातील हिसार गावी बाबा रामपाल याच्या अटकेसाठी प्रयत्नशील असलेल्या पोलिसांना अटकाव करण्यासाठी त्यांच्या समर्थकांनी काल पोलिसांवर तुफान दगडफेक केली. यावेळी झालेल्या धुमश्चक्रीत पोलिसांनी या घटनेचे वार्तांकन करणार्‍या पत्रकारांनाही लक्ष्य करून मारहाण केली. आश्रमाच्या परिसराला युद्धभूमीचे स्वरूप आले आहे.या आश्रमात सदर बाबाच्या कमांडोंचे एक दल असून त्यांनी व बाबाच्या भक्तगणांनी पोलिसांना आश्रमात घुसू दिले नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाने या सार्‍या प्रकाराची दखल घेतली असून राज्य सरकारकडून अहवाल मागितला आहे.
पंजाब व हरयाणा उच्च न्यायालयाने बाबा रामपाल याला एका प्रकरणात सोमवारपर्यंत हजर करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याला अटक करण्यास त्याच्या समर्थकांनी विरोध दर्शवीत आंदोलन पुकारले आहे. आश्रमात हजारो नागरिक स्त्री पुरूष असून बाबांच्या कमांडोंनी त्यांना बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे असे काहींनी आश्रमातून बाहेर आल्यावर सांगितले.