राधा तिंबलो यांची पाच तास जबानी

0
101

विदेशी बँकांतील काळा पैसा
अंमलबजावणी संचालनालयाने तिंबलो प्रायव्हेट लिमिटेड खाण कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक राधा तिंबलो यांची कालही पाच तास जबानी घेतली.गेल्या दि. १८ नोव्हेंबर रोजी त्यांची सात तास जबानी घेतली होती. खाण व्यवहारासंबंधीचे त्यांच्याकडील बरेच दस्तऐवज अंमलबजावणी संचालनालयाने ताब्यात घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. सोमवारी बेल्लारी येथील मेसर्स के. बी. स्टील प्रा. लिमिटेड कंपनीचे सरव्यवस्थापक विजयकुमार यांची जबानी नोंदविली होती. सर्वोच्च न्यायालयाला सादर केलेल्या काळ्या पैशांच्या पहिल्या तीन जणांच्या यादीत तिंबलो यांचे नाव असल्याचे या आधीच जाहीर झाले आहे. त्यांचे पूत्र चेतन तिंबलो यांचीही चौकशी चालू आहे. त्यांचीही याआधी अंमलबजावणी संचालनालयाने जबानी घेतली आहे.