राज्य सरकारतर्फे आज मनोहर पर्रीकर पुण्यतिथी

0
41

गोवा सरकार आज दि. १७ मार्च २०२२ रोजी स्मृती स्थळ, मिरामार येथे माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रीकर यांची पुण्यतिथी पाळणार आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह इतर मान्यवर सकाळी ९.१५ वाजता स्मृतीस्थळ मिरामार येथील स्वर्गीय मनोहर पर्रीकर यांच्या समाधीला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहतील.