कोरोनाच्या चौथ्या लाटेची डब्ल्यूएचओकडून भीती

0
11

चीनमध्ये ओमिक्रॉनचा नमुना इA.२ चा ङ्गैलाव वेगाने होत आहे. दक्षिण आङ्ग्रिकेत आढळून आलेला प्रकार आता चीन व्यतिरिक्त पश्चिम युरोपमध्ये पसरत आहे. त्यामुळे भारतात पुन्हा एकदा कोरोनाची लाट येणार अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने इA.२ चा प्रसार वेगाने होत आहे पण तो घातक नसल्याचा दावा केला आहे. दरम्यान, भारतातील कोविड टास्क ङ्गोर्सचे प्रमुख नरेंद्र कुमार यांनी भारतात इA.२ व्हेरियंट कोरोनाची प्रकरणे वाढण्याची शक्यता कमी असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता धोका आणि देशात कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती या पार्श्वभूमीवर काल केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एक महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले.