बाजारपेठांतील दुकानदारांनी दिशानिर्देशांचे पालन करावे

0
152

 

>> राज्य कार्यकारी समितीची सूचना

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या दिशानिर्देशांचे पालन करण्यासाठी राज्यातील बाजारपेठ संध्याकाळी ६ वाजता बंद केली पाहिजे आणि सकाळी ८ वाजण्यापूर्वी उघडता कामा नये. दुकानांच्या वेळेसंबंधीची सूचना अत्यावश्यक सेवांसाठी लागू होणार नाही. सामाजिक अंतर, मास्क, सॅनिटायझर आणि इतर सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे पालन केले पाहिजे, अशी सूचना राज्य कार्यकारी समितीच्या बैठकीत करण्यात आली.

अबकारी आयुक्तालयाने राज्यातील मद्याची दुकाने सायंकाळी ६ वाजता बंद करण्याकडे लक्ष दिला पाहिजे. या दुकानांवर काम करणारे कर्मचारी संध्याकाळी ७ वाजता आपापल्या घरी पोहोचले पाहिजेत. एमएचएच्या निर्देशानुसार मद्यविक्रीच्या दुकानांनी सामाजिक अंतराच्या निकषांचे काटेकोरपणे पालन करतात की नाही याची तपासणी करण्याची गरज आहे.

राज्यातील पंचायतीकडून परराज्यातील मजुरांची आकडेवारी गोळा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आत्तापर्यंत ३० हजार मजुरांची माहिती गोळा करण्यात आली आहे. त्यातील ९० टक्के मजुरांनी आपल्या गावी परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती पंचायत संचालकांनी दिली.

राज्यातील ग्रामपंचायतींनी १९३८ विविध प्रकारच्या कामांना मान्यता दिली असून या कामात ५५६८ एवढा मजूर वर्ग गुंतलेला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.