राज्यात 24 तासांत नवे 42 कोरोनाबाधित

0
3

राज्यात मागील चोवीस तासांत 587 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात नवीन 42 कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी 5 रुग्णांना इस्पितळात दाखल करण्यात आले. राज्यात नवीन कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण 7.1 टक्के एवढे आहे. मागील 24 तासांत इस्पितळातून 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर 57 रुग्ण कोरोनामुक्त झाले. परिणामी राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या 256 एवढी झाली आहे.