राज्यात १२, १३ रोजी पावसाची शक्यता

0
270

अंदमाननजीक समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने तयार झालेल्या वादळामुळे राज्यात १२ आणि १३ ऑक्टोबरला काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने काल वर्तविली आहे.

अंदमाननजीक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गोव्यातील हवामानात बदल झाला असून आगामी पाच दिवस राज्यातील काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
अंदमाननजीकचे वादळ आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीवर येत्या १२ ऑक्टोबरला धडकणार आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले असून उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे काही भागात पावसाची शक्यता असून येत्या १२ आणि १३ ऑटोबरला काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.