राज्यात सध्या ४६४ कोरोना रुग्ण

0
167

>> बरे होण्याचे प्रमाण ९७.७० टक्के

राज्यात गेल्या २४ तासांत नवीन २९ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, आणखी कोरोना रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही.
राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५४,५९१ एवढी झाली आहे. सध्याच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४६४ एवढी झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ७८७ एवढी झाली आहे.

राज्यातील आणखी ५३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण ५३ हजार ३४० रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७० टक्के एवढे आहे. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन १७ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन २३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

चोवीस तासांत नवीन १०५३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील २.७५ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. पर्वरी आरोग्य केंद्रातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३४ झाली आहे.
पणजीत सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या २६ झाली आहे. मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३५ झाली आहे. फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ४० रुग्ण, केपे २९ रुग्ण, चिंबल ३० रुग्ण, कांदोळी ३५ रूग्ण, म्हापसा २३ रुग्ण, कुडचडे येथे २३ रुग्ण आहेत. सांगे आणि शिरोडा येथील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या शून्यावर आली आहे.