राज्यात सक्रिय कोरोन रुग्णांच्या संख्येत वाढ

0
14

राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन १८ कोरोना बाधित आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना सक्रिय रुग्ण संख्या ११५ झाली आहे. राज्यात नवीन ४८८ स्वॅबचे नमुने तपासण्यात आले आहेत. मात्र, राज्यात आणखी कोरोना बळींची नोंद नाही. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३८३२ एवढी आहे. चोवीस तासांत आणखी ४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३९ टक्के एवढे आहे.