राज्यात वाळू उपशासाठी परवान देण्याची प्रक्रिया सुरू : मुख्यमंत्री

0
20

राज्यात वाळू उपसा करण्यासाठी परवाने देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जात आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दोनापावल येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यातील नद्यांतील वाळू उपसा करण्यासाठी एनआयओकडून अहवाल मागविण्यात आले आहेत. फक्त दोन नद्यांतील अहवाल प्राप्त झाला आहे. मांडवी नदीसंबंधीचा अहवाल प्राप्त झालेला नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

दरम्यान, एनआयओ राम सेतू अभ्यासाचे नेतृत्व करत आहे. राम सेतूची तपासणी करण्याचे काम सुरू आहे. राम सेतूच्या परिसरात वाळूच्या प्रमाणात वाढ झाल्याने नमुने घेण्यासाठी ड्रिलिंगचे काम हाती घेतले जाईल, अशी एनआयओ संचालक सुनील कुमार सिंग यांनी काल दिली.