विमानतळावर मास्क अनिवार्य

0
36

मागील काही दिवसांत देशभरात कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग लक्षात घेता डीजीसीए अर्थातच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने नवीन नियमावली जारी केली आहे. आता विमानातून प्रवास करणार्‍या नागरिकांना मास्क वापरणे अनिवार्य केले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर योग्य ती कारवाई करण्याचा आदेश डीजीसीएकडून देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने डीजीसीएच्या कामकाजावर ताशेरे ओढले होते. त्यानंतर विमानतळावर करोना नियम कठोर करण्यात आले आहेत. बुधवारीी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने विमानतळ आणि विमान कंपन्यांना निर्देश दिले आहेत. मास्क घालण्यासह कोविड-१९ च्या इतर नियमांचे काटेकोर पालन करावे, असे संबंधित आदेशात म्हटले आहे.