राज्यात परतण्याचे पर्रीकरांकडून संकेत

0
86

साळ येथील एका कार्यक्रमात रक्षामंत्री पर्रीकर यांनी पत्रकारांशी बोलताना ‘होय मी परत येतोय’ असे सांगत लवकरच केंद्रीय जबाबदारीतून मुक्त होऊन गोव्याच्या राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत काल दिले. सध्या ज्या पध्दतीने भाभासूमंने पवित्रा घेतलेला आहे. त्याबाबत पर्रीकर नाराज आहेत. प्रत्येक गोष्टीवर तोडगा काढणे शक्य असून त्यादृष्टीने आपणही प्रयत्नशील असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.