राज्यात नवे १६४ कोरोना रुग्ण, ४ बळी

0
45

राज्यात गेल्या चोवीस तासात नवे १६४ कोरोना रुग्ण सापडले असून, ४ रुग्णांचा बळी गेला आहे. कित्येक महिन्यानंतर सोमवारी शून्य बळीची नोंद झाली होती. त्यानंतर मंगळवारी पुन्हा एकदा कोरोना बळींची नोंद झाली. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या १७३२ एवढी झाली आहे, तर कोरोना बळींची एकूण संख्या ३१०१ एवढी आहे.

राज्यात जुलै महिन्यात कोरोना रुग्णांच्या बळी आणि नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार दिसून येत आहे. कालच्या ४ बळींपैकी बांबोळी येथील गोमेकॉत तीन रुग्णांचा, तर उत्तर गोव्यातील एका खासगी इस्पितळात एका रुग्णाचा बळी गेला आहे.

राज्यात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३.८३ टक्के टक्के एवढे आहे. चोवीस तासात ४२८२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील १६४ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.

गेल्या २४ तासांत राज्यात आणखी १९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१४ टक्के एवढे आहे.