राज्यात तीन दिवसांचा दुखवटा

0
16

>> भाजपच्या जाहिरनाम्याच्या प्रकाशनासह मोदींची उत्तर गोव्यातील सभा रद्द

गोव्याच्या सुकन्या भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे गोवा सरकारने काल रविवार दि. ६ फेब्रुवारी ते उद्या मंगळवार दि. ८ फेब्रुवारीपर्यंत तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. या काळात राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर राहणार आहे.
दरम्यान, काल सत्ताधारी भाजप पक्षाने लता मंगेशकर यांच्या निधनामुळे आपले सर्व कार्यक्रम रद्द केले.

भाजपच्या निवडणूक जाहिरनाम्याचे काल दुपारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन होणार होते. मात्र, पणजीत होणार असलेला हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उत्तर गोव्यातील मतदारासाठीची आभासी पद्धतीने आयोजित केली जाणार असलेली सभाही रद्द करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री, तानावडेंनी घेतले पार्थिवाचे दर्शन

लता मंगेशकर यांच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर काल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, गोव्यात असलेले गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी तातडीने मुंबईला जाऊन त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. तसेच अंत्ययात्रेत सहभागी होऊन पुष्पांजली वाहिली.