राज्यात चोवीस तासांत कोरोनाचे १० नवे रुग्ण

0
11

राज्यातील कोरोना स्वॅबच्या तपासणीमध्ये घट झाली असून चोवीस तासांत ३१६ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून नवीन १० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. त्यातील एका कोरोना बाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना सक्रिय रूग्णसंख्या २०८ एवढी आहे. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण ३.१६ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत आणखी २१ बाधित बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३८ टक्के एवढे आहे.