भारतीय हवाई दलात ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर दाखल

0
8

>> संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते वायूदलाकडे ‘प्रचंड’ सुपूर्द

भारतीय हवाई दलात एलसीएच हेलिकॉप्टर ‘प्रचंड’ हे नवीन स्वदेशी ‘मेड इन इंडिया’ लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर दाखल झाले आहे. त्यामुळे आता भारताची हवाई ताकद आणखी वाढली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते जोधपूरर एयरबेसवर हा कार्यक्रम झाला. यावेळी या कार्यक्रमाला चीफ ऑफ एयर स्टाफ चीफ मार्शल वीआर चौधरी यांचीही उपस्थिती होती. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ‘प्रचंड’ हेलिकॉप्टरमधून उड्डाण केले.

आज सैन्य दलात या प्रचंड लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टरचा पहिला ताफा दाखल होणार आहे. या अंतर्गत एकूण १० हेलिकॉप्टर सैन्य दलात सामील करण्यात येतील. या हल्ला करणार्‍या हेलिकॉप्टरमध्ये शत्रूवर अचूक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आहे.
हे हेलिकॉप्टर जोधपूर सीमेजवळ आजपासून तैनात केले जाणार आहे. शत्रूवर भेदक मारा करणारे हे हेलिकॉप्टर पर्वतरांगांमध्ये सात युनिटमध्ये तैनात केले जाणार आहेत.

प्रचंडची वैशिष्ट्ये
हे हेलिकॉप्टर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीने तयार केलेले हेलिकॉप्टर आहे. हे हेलिकॉप्टर आधुनिक तंत्रज्ञान आणि इंजिनसह सुसज्ज आहे. यामध्ये २० मिमी बंदुक, ७० मिमी रॉकेट प्रणाली आणि हवेतून क्षेपणास्त्र डागण्याची सुसज्ज यंत्रणा आहे. कमी वजनामुळे हे हेलिकॉप्टर इतर हल्ला करणार्‍या हेलिकॉप्टरपेक्षा जलद आहे. उंच भागात उड्डाण आणि लँडीग करण्याची क्षमता या हेलिकॉप्टरमध्ये असून सर्व प्रकारच्या हवामानात लढण्याची क्षमताही आहे.