राज्यात कोरोना रुग्णांत मोठी वाढ

0
11

राज्यात मागील चोवीस तासांत नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, नवीन १४ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. परिणामी राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या ३९ एवढी झाली आहे. राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन १४३३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली, त्यातील १४ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या आत्तापर्यंत ३८३२ एवढी आहे. चोवीस तासांत आणखी २ जण कोरोना मुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४२ टक्के एवढे आहे.