राज्यातील सक्रिय कोरोनाबाधित १७ वर

0
25

राज्यात मागील चोवीस तासांत नवीन २७१ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यात नवीन २ कोरोनाबाधित आढळून आले असून, सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १७ एवढी झाली आहे. राज्यात ४ डिसेंबरला नवीन एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला नव्हता. कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण ०.७ टक्के एवढे आहे. मागील चोवीस तासांत आणखी २ जण कोरोनामुक्त झाले आहेत.