राज्यातील संचारबंदी आठवड्याने वाढवली

0
75

कोरोनामुळे राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत राज्य सरकारने पुन्हा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता ही संचारबंदी पुढील सोमवार दि. १६ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

मागील आठवड्यात सरकारaने बार आणि रेस्टॉरंट्‌सरात्री ११ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेन सुरू ठेवण्याची मुभा दिली होती ती तशीच आहे. परराज्यातून विशेषतः केरळमधून येणार्‍यांना आरटीपीसीआर चाचणीचा अहवाल बंधनकारक केला आहे. तर अन्य राज्यांतून गोव्यात येताना ७२ तासांपर्यंत कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र अथवा आरटीपीसीआर चाचणीची सोय करण्यात आली आहे. सरकारने राज्यातील कॅसिनो, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स बंदच असतील.