राज्यातील विद्यालये शनिवार दि. 6 जून 2026 पासून पुन्हा सुरू होणार आहेत, अशी माहिती शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी दिली. राज्यातील शैक्षणिक वर्ष 2026-27 ला एप्रिल 2026 पासून प्रारंभ झालेला आहे. उन्हाळी सुट्टीनंतर 6 जूनपासून पुन्हा विद्यालयांचे वर्ग घेतले जाणार आहे. राज्यातील वाढती उष्णता आणि मान्सून लांबणीवर पडलेला असला, तरी विद्यालयाच्या सुट्टीत वाढ केली जाणार नाही. विद्यालये नियोजित तारखेलाच सुरू होणार आहेत. उष्णतेमुळे मुलांना लवकर सोडण्याचा पर्याय आहे, असेही झिंगडे यांनी सांगितले.