Home बातम्या राज्यातील प्रमुख चौकांतसीसीटीव्ही कॅमेरे ः गुदिन्हो

राज्यातील प्रमुख चौकांतसीसीटीव्ही कॅमेरे ः गुदिन्हो

0

राज्यभरातील प्रमुख चौकांमध्ये अत्याधुनिक एआय-सक्षम नाइट-व्हिजन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची वाहतूक खात्याची योजना आहे, अशी घोषणा वाहतूकमंत्री मावीन गुदिन्हो यांनी काल केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात 92 कॅमेरे बसवले जातील, त्यापैकी 25 पुढील काही आठवड्यांत आणि सुमारे 50 कॅमेरे दोन महिन्यांत कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पासाठी निविदा आधीच काढण्यात आलेली आहे. कालांतराने कॅमेऱ्यांची संख्या 200 हून अधिक केली जाणार आहे, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले. या कॅमेऱ्यांवर एका केंद्रीकृत नियंत्रण केंद्राद्वारे देखरेख ठेवली जाणार आहे. एआय सक्षम कॅमेऱ्यामुळे अतिवेगाला आळा बसून अपघात कमी होण्याची अपेक्षा आहे, तसेच गुन्हेगारी कारवायांवर लक्ष ठेवला जाऊ शकतो, असेही मंत्री गुदिन्हो यांनी सांगितले.