सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी गौतम खट्टर याने काल जामिनासाठी वास्को येथील प्रथम वर्ग न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. गोवा पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाने सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान प्रकरणात गौतम खट्टर याला हिमाचल प्रदेश पोलिसांच्या सहकार्यातून कुल्लू हिमाचल प्रदेश येथे अटक करून गोव्यात आणला आहे. सध्या, संशयित आरोपी गौतम खट्टर याला 6 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आलेली आहे.