राज्याच्या विकास दरात घसरण

0
86

>> आर्थिक सर्वेक्षण अहवालात माहिती

 

राज्याचा विकास दर सन २०१३-१४ मधील ७.७१ टक्क्यांवरून गेल्या आर्थिक वर्षात ७.३७ टक्क्यांपर्यंत खाली आला असून अर्थव्यवस्थेच्या प्राथमिक क्षेत्राचे राज्याच्या अर्थव्यवस्थेतील योगदान २०१३-१४ मधील १० टक्क्यांवरून वजा १६.४४ टक्के एवढे कमी झाले आहे. खाण बंदीमुळे हे घडल्याचा दावा आर्थिक सर्वेक्षण अहवालात करण्यात आला आहे. अर्थव्यवस्थेच्या सेकंडरी क्षेत्राचे राज्याच्या अर्थव्यवस्थेतील योगदान सन २०१३-१४ मधील ५.६० टक्क्यांवरून गेल्या वर्षी ६.७३ टक्क्यांपर्यंत आणि टर्शियरी क्षेत्राचे योगदान २०१३-१४ मधील ८.६४ टक्क्यांवरून ९.५५ टक्के वाढले आहे. राज्याच्या महसुली उत्पन्नात कर महसुलाचा वाटा ६३ टक्के असून करेतर महसूल २९.४८ टक्के आहे.