राज्यसभेत पर्रीकरांनी घेतली दिग्विजयांची फिरकी

0
94

गोव्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल अचानक राज्यसभेत उपस्थिती लावली व तेथील आपल्या भाषणातून गोवा कॉंग्रेसचे प्रभारी तथा खासदार दिग्विजय सिंग यांना गोव्यात कॉंग्रेसचे सरकार स्थापन करण्यात त्यांना अपयश आल्याबद्दल डिवचले. पर्रीकर यांच्या त्या वक्तव्यामुळे सभागृहात गदारोळ माजला. कॉंग्रेसच्या सदस्यांनी हौद्यात धाव घेऊन घोषणाबाजी केली.
पर्रीकर यांनी शून्य तासावेळी सभागृहात प्रवेश केला. त्यांनी यावेळी गोव्यात कॉंग्रेसजवळ सर्वाधिक आमदार असूनही सिंग यांच्याकडे पाहत तुम्ही गोव्यात आराम करत राहिला व आम्ही मात्र सरकार घडवले असे उद्गार काढले. यावेळी भाजपने अनैतिक गोव्यात सरकार स्थापन केल्याचा आरोप कॉंग्रेस सदस्यांनी केला.