राज्यपालांच्या कथेवर आधारित चित्रपट दाखवणार

0
93

गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या कथेवर आधारित असलेला ‘दत्तक’ हा चित्रपट ईएसजीतर्फे लोकांना दाखवण्याचा निर्णय काल ईएसजीचे उपाध्यक्ष दामू नाईक यांनी मृदुला सिन्हा यांची भेट घेतल्यानंतर घेतला.
या चित्रपटाची निर्मिती एनएफडीसीने केलेली आहे. हा चित्रपट राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्या लघुकथेवर आधारित आहे.
दामू नाईक यांनी काल राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेतली तेव्हा त्यांच्याबरोबर ईएसजीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सातार्डेकर व माहिती खात्याचे जॉन आगियार हे हजर होते.