राजस्थान सर्वबाद २४०

0
88

>> ऋत्विक नाईकचे ५ बळी

मध्यमगती गोलंदाज ऋत्विक नाईक याने ३७ धावांत घेतलेल्या पाच बळींच्या जोरावर गोव्याने राजस्थानचा पहिला डाव २४० धावांच रोखला. कूच बिहार अंडर १९ क्रिकेट स्पर्धेतील हा सामना पर्वरी येथील अकादमी मैदानावर कालपासून सुरू झाला.

नाणेफेक जिंकून राजस्थानने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अर्धशतकी वेस ओलांडेपर्यंत त्यांचे तीन आघाडीचे फलंदाज बाद झाला. यानंतर कारवासरा व अहुजा (५९ धावा, ९३ चेंडू, ११ चौकार) यांनी ५४ धावांची तसेच अंशुल गढवाल व अहुजा यांनी ५२ धावांची भागीदारी करत संघाला सुस्थितीत आणले. के. बनिवालने ७७ चेंडूंचा सामना करताना ७ चौकार व २ षटकारांसह ५५ धावा चोपल्याने राजस्थानला दोनशे धावांचा टप्पा पार करता आला. गोव्यातर्फे ऋत्विक नाईकने ५ तर बलप्रीत सिंगने २ गडी बाद केले. दिवसअखेर गोव्याने सलामीवीर राहुल मेहता (७) याला गमावन १२ धावा केल्या आहेत.

संक्षिप्त धावफलक ः राजस्थान पहिला डाव ८१.२ षटकांत सर्वबाद २४० (डी. गजराज ११, सुमीत राज १९, चौहान ६. करवासारा ३५, अहुजा ५९, गढवाल २०, बनिवाल ५५, माथुर १५, ऋत्विक नाईक ३७-५, बलप्रीत सिंग ६०-२, वंतामुरी ६६-१, बांदोडकर २२-१) वि. गोवा पहिला डाव ५.३ षटकांत १ बाद १२ (राहुल मेहता ७, मंथन खुटकर नाबाद ०, एस. कुमार ०-१)