जलद बुद्धिबळात नीरज सारिपल्ली जेता

0
83

डिचोली रोटरी क्लब व डिचोली तालुका बुद्धिबळ संघटना यांनी आयोजित अखिल गोवा जलद बुद्धिबळ स्पर्धेत नीरज सारिपल्ली (सासष्टी) याने साडेसात गुणांसह विजेतेपद पटकावताना रोख साडेसात हजार व करंडकाची कमाई केली.

माधवन जी (तिसवाडी) व अनिरुद्ध पार्सेकर प्रत्येकी ७ गुणांसह अनुक्रमे दुसर्‍या व तिसर्‍या स्थानी राहिले. माधवनने पाच हजारांचे तर अनिरुद्धने अडीच हजारांचे बक्षीस मिळविले. येथील हिराबाई झांट्ये सभागृहात आयोजित या स्पर्धेत सुमारे ३०० स्पर्धकांनी भाग घेतला होता. बक्षीस वितरण समारंभाला गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर, डिचोली तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष मिलिंद शिरोडकर, चंदू होसमनी, शंकर होसमनी, विठ्ठल वेर्णेकर, सत्यवान हरमलकर, सरगम ङ्गळारी, अरविंद म्हामल, विंदेश शिरोडकर, आनंद देसाई, दुर्गेश कारापूरकर आदी उपस्थित होते. मिलिंद शिरोडकर यांनी स्वागत केले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते चषक रोख बक्षीस व प्रशस्तिपत्रे वितरित करण्यात आली.

चौथा ते विसावा क्रमांक प्राप्त खेळाडू ः ओम बर्डे (७), विराज पोरोब (७), सचिन गावडे (७), पार्थ साळवी (६.५), गुंजल चोपडेकर (६.५), रुद्रेश फडते(६.५), विल्सन क्रुझ (६.५), नंदिनी सारिपल्ली (६), श्रेयस आरोंदेकर (६), आयुष पेडणेकर (६), प्रतीक बोरकर (६), देवेश नाईक (६), ईशान पागी (६), साईल देसाई (६), सान्वी गावकर (६), सिद्धेश मराठे (६), उत्कर्ष गणपुले (६).