राजस्थानमधील राजकीय पेच कायम

0
127

राजस्थानमध्ये उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बंड केल्यानंतर तेथे पेच निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री अशोक सेहलोत यांचे सरकार अल्पमतात आलेले आहे. तसेच पायलट हे भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री गेहलोत यांनी आपल्याकडे बहुमत असल्याचा केलेला दावा पायलट यांनी फेटाळून लावत आपल्याला ३० आमदारांचे पाठबळ असल्याचे पायलट यांचे म्हणणे आहे. गेहलोत यांच्याकडे बहुमत एसल तर त्यांनी आमदारांची पूर्ण संख्या सांगावी असे आवाहन पायलट यांनी दिले असून मुख्यमंत्री गहलोत यांनी बोलावलेल्या बैठकीला २० आमदार अनुपस्थित होते.

कॉंग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सोमवारी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या पाठिंब्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तसंच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. मुख्यमंत्री गहलोत यांनी सरकारी निवासस्थानावर विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. बैठकी कॉंग्रेसचे आणि अपक्ष आमदार उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री गहलोत यांना एकूण १०६ आमदारांचा पाठिंबा आहे. हे आमदार बैठकीत उपस्थित होते, असे कॉंग्रेसमधील सूत्रांनी सांगितले. सरकार आणि पक्ष विरोधी कारवायांमध्ये सामिल असलेल्या आमदारांविरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. या बैठकीला सचिन पायलट आणि त्यांचे निकटवर्ती मानले जाणारे आमदार अनुपस्थित होते.