राजकीय विरोधकांमुळे आपल्यावर अनेक गुन्हे

0
91

>> कॉंग्रेस उमेदवार बाबुश मोन्सेर्रात यांचा दावा

आपणावर खोटे आरोप करून आपल्या राजकीय विरोधकांनी आपणावर विविध गुन्हे नोंदवले आहेत. त्यात बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचाही समावेश आहे, असे पणजी पोटनिवडणुकीतील कॉंग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेर्रात यांनी काल पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.

आपण गेली १७ वर्षे सार्वजनिक जीवनात आहे. आपण कित्येक निवडणुका लढवल्या. पण कधीही हिंसाचार केला नाही, असे मोन्सेर्रात म्हणाले. तुमच्यावर पणजी पोलीस स्थानकावर हल्ला केल्याचा आरोप आहे. तुमच्यावर बलात्काराचाही गुन्हा नोंद झालेला आहे, असे असताना तुम्ही कधीही हिंसा केली नाही असे कसे काय म्हणता, असे पत्रकारांनी विचारले असता मोन्सेर्रात म्हणाले की, आपणावर खोटे आरोप करून राजकीय विरोधकांनी आपणावर विविध गुन्हे नोंदवले आहेत. त्यात बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्याचाही समावेश आहे. वरील गुन्ह्यांप्रकरणी आपणावर आरोपपत्र ठेवून न्यायालयात सुनावणी घेण्यात आली असती तर आतापर्यंत या गुन्ह्यांतून आपली निर्दोष सुटका झाली असती, असा दावाही मोन्सेर्रात यांनी यावेळी केला. पणजीतून आपण निवडणूक लढवू नये यासाठीच आपल्या राजकीय विरोधकांनी आपणावर बलात्काराचा खोटा आरोप करून गुन्हा नोंद केला होता, असा दावा मोन्सेर्रात यांनी त्यासंबंधी विचारलेल्या प्रश्‍नाचे उत्तर देताना केला.

पणजीकरांना २५ वर्षे
नोकर्‍या मिळाल्या नाहीत
पणजीतील मतदारांना गेली २५ वर्षे नोकर्‍याच मिळाल्या नाहीत, असा आरोप करून आपण निवडून आल्यानंतर दर एका कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देणार असल्याचे मोन्सेर्रात म्हणाले.

मतदारांना बदल हवाय
पणजी मतदारसंघातील मतदारांना आता बदल हवा आहे, असे प्रचाराच्या दरम्यान मतदारांची भेट घेतली असता दिसून आले. पणजीतील सुमारे ९० टक्के मतदारांची आपण भेट घेतली. ज्या १० टक्के लोकांपर्यंत पोचू शकले नाही त्यांची माफी मागत असल्याचे ते म्हणाले. पणजीसाठी एक ‘व्हिजन