रविवार, सोमवारी राज्यात जोरदार पावसाचा इशारा

0
100

>> आतापर्यंत ४२ इंच पावसाची नोंद

राज्यातील काही भागात येत्या ११ आणि १२ जुलै रोजी जोरदार पाऊस कोसळण्याचा इशारा येथील हवामान विभागाने दिला आहे.
जून महिन्यात पावसाने दमदार सुरुवात केली होती. आता पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. राज्यात आत्तापर्यत ४१.९२ इंच पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा ९ टक्के कमी आहे. त्याचप्रमाणे आज व उद्याही राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

दरम्यान, समुद्रात जाण्याचे टाळा आणि खडकाळ भागापासून दूर राहण्याची सूचना दृष्टी या संस्थेने केली आहे. पावसाळ्यात खडक फार निसरडे असतात आणि लाटांची उंची आणि तीव्रता यामुळे व्यक्ती समुद्रात ओढला जातो. मागील आठवड्यात सेल्फी घेण्याच्या नादात एक मुलगा समुद्रात कोसळला आहे. दोन युवक जीवरक्षकांची सूचना न मानता समुद्रात गेल्याने दुर्देवी अंत झाला आहे, असे जीवरक्षक संस्थेने म्हटले आहे.