रविवारी कोरोनाचे राज्यात ६६ रुग्ण

0
76

राज्यात चोवीस तासांत नवे ६६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून आणखी एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ७४९ झाली आहे. कोरोना बळींची एकूण संख्या ८०६ एवढी झाली आहे. बांबोळी येथे गोमेकॉमध्ये केपे येथील ७३ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्या रुग्णाला ८ मार्चला गोमेकॉच्या इस्पितळात दाखल करण्यात आले होते.

राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५५,९१७ एवढी झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले आणखी ८० रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत एकूण ५४ हजार ३६२ रुग्ण बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२२ टक्के एवढे आहे.

चोवीस तासांत नवीन १,३१० स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ५.०३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ३५ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. इस्पितळात नवीन १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.

पणजीत ११० रुग्ण
पणजीत उच्च आरोग्य केंद्राच्या कक्षेतील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ११० इतकी आहे. मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १०८ झाली आहे. चिंबल आरोग्य केंद्राच्या कक्षेतील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. पर्वरीत सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ४२ रुग्ण, फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात ४५ रुग्ण, म्हापसा ५१ रुग्ण, वास्कोत ४५ रुग्ण, कासावली ४६ रुग्ण, कुठ्ठाळीत ३८ रुग्ण, कांदोळी २२ रुग्ण, खोर्ली २४ रुग्ण आहेत.

लसीकरणासाठी राज्यात
आज व उद्या शिबिर

राज्यातील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आणि ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील अन्य आजार असलेल्या नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी सोमवार १५ आणि मंगळवार १६ रोजी राज्यातील ३७ आरोग्य केंद्रावर खास कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराबाबत ग्रामपंचायतीचे सरपंच, पंच सदस्य, पंचायत सचिव, पंचायत स्वयंपूर्ण मित्र आदींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आलेली आहे.