रघुवंशप्रसाद सिंह यांचे निधन

0
250

माजी केंद्रीय मंत्री रघुवंशप्रसाद सिंह (७४) यांचे काल निधन झाले. ते काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर काल त्यांचे निधन झाले. दोन दिवसांपूर्वीच आयसीयू वॉर्डात असतानाच रघुवंश प्रसाद सिंह यांनी राजदचा राजीनामा दिला होता. रघुवंश प्रसाद यांच्या निधनानंतर राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांनी ट्विट करून शोक व्यक्त केला.