रक्त द्या, आयुष्य वाचवा

0
308
  • डॉ. सुषमा किर्तनी
    पणजी

रक्तदानाने आपण दुसर्‍याचे आयुष्य तर वाचवतोच, पण त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये नवीन रक्तपेशी निर्माण होतात, आपण ताजेतवाने होतो. रक्तदानाने लाखो-करोडो लोकांचा जीव वाचतो व त्यांच्या प्रकृतीत खूपच सुधारणा होते.

१४ जून हा ‘जागतिक रक्तदान दिन’ म्हणून प्रत्येक वर्षी साजरा केला जातो. कार्ल लँडस्टेनर या संशोधकाने अ, इ, ज या रक्तगटांचा शोध लावला व त्यामुळे त्यांचा जन्मदिवस हा जागतिक रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो.
हा दिवस साजरा करण्याचे काय महत्त्व आहे?…
जागतिक स्तरावर जागरूकता निर्माण करणे हेच मुख्यत्वे हा दिवस साजरा करण्याचे उद्दिष्ट आहे. सुरक्षित रक्त आणि रक्तातील घटक एका व्यक्तीच्या शरीरातून दुसर्‍या व्यक्तीच्या शरीरात संक्रमित करता येते आणि शक्यतो प्रत्येकाने हे दान स्वेच्छेने व कोणतीही किंमत न घेता करणे हे महत्त्वाचे. त्याचप्रमाणे रक्तदान कुठे करावे व त्यासाठी कोणत्या सोयी उपलब्ध आहेत याची माहितीसुद्धा रक्तदात्याला दिली जाते.
सुरक्षित रक्त आणि रक्तातील घटक आणि त्यांचे संक्रमण ही आरोग्याच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब आहे. रक्तदानाने लाखो- करोडो लोकांचा जीव वाचतो व त्यांच्या प्रकृतीत खूपच सुधारणा होते. प्रत्येक माणसाला आयुष्यात कधीतरी रक्ताची आवश्यकता पडू शकते, पण ते कुठे मिळते; मिळेल की नाही… हाच तर मोठा प्रश्‍न आहे. आपल्यासारख्या विकसित देशात रक्ताचा तुटवडा हा नेहमीच असतो. सध्या कोरोना महामारीने आपला देश व देशवासी ग्रस्त आहेत. तरीही कुणालाही रक्ताची गरज पडली तर आपले रक्तदाते हे कधीही रक्तदान करण्यास तयार असतात.

या वर्षीचे म्हणजे २०२१चे जागतिक रक्तदान दिवसाचे घोषवाक्य आहे – ‘‘रक्त द्या आणि जगाला जगवा’’(ॠर्ळींश इश्रेेव | घशशि ींहश थेीश्रव इशरींळपस) रक्तदानाने दुसर्‍याचा जीव वाचवून रक्तदाते हे जग जिवंत ठेवतात. त्यामुळे बाकी लोकांना हा संदेश मिळतो की रक्तदान हे महान दान आहे व ते नियमितपणे करा व निरामय आरोग्य राखण्यास हातभार लावा.

या वर्षीच्या कार्यक्रमामध्ये खालील गोष्टींवर भर देण्यात आला होता…
१) जगातील सर्व रक्तदात्यांना धन्यवाद देणे आणि रक्तदानाबद्दल सगळ्या लोकांमध्ये जागृती निर्माण करणे. तसेच मोबदला न घेता रक्तदान करण्यावर पण भर दिला जातो.
२) रक्तदानाच्या सामुदायिक मूल्यांकडे लक्ष वेधले जाते ज्यामुळे सगळ्यांमध्ये प्रेमाची व एकमेकांबद्दल आदराची भावना उत्पन्न होते.
३) दुसर्‍यांना प्रोत्साहित करणे व रक्तदानाचे महत्त्व पटवून देणे.
४) युवा संघटना व युवकांनी पुढे येऊन आरोग्य उत्तम राखण्यासाठी लोकांना मदत करणे.
इटालीत यावर्षी हा दिवस नॅशनल ब्लड सेंटरमध्ये स्थानिक हॅकॉथन दिवस म्हणून साजरा केला जाईल. जागतिक पातळीवरील कार्यक्रम हा रोममध्ये १४ जूनला साजरा केला जाईल.

कित्येक प्रकारचे आजार… जसे थॅलेसेमिया, ऍनिमिया, ब्लड कँसर, सेप्टिसेमिया तसेच विविध शस्त्रक्रिया यांमध्ये रुग्णाला रक्ताची आवश्यकता भासते. त्याचप्रमाणे बाळंतपणात जर खूपच रक्तस्राव झाला तर स्त्रीला रक्त देण्याने त्या आईचे व बाळाचे आयुष्य वाचू शकते. ज्यावेळी रक्तदान करणे व त्याचे महत्त्व लोकांना ठाऊक नव्हते, त्यावेळी कितीतरी लोकांनी आपले आयुष्य गमावले.

खरं तर रक्तदान करणे हे खूप सोपे आहे पण कितीतरी लोकांना ते माहीतच नाही. लोकांमध्ये असा समज पसरला आहे की रक्तदान केल्याने आपण आपली प्रतिकारशक्ती घालवून बसू किंवा मी कशाला दुसर्‍यासाठी रक्त देऊ; मला काय फायदा? आपल्या शरीरात ४ ते ५ लीटर एवढे रक्त असते. कोणताही पुरुष हा दर तीन महिन्यांनी तर स्त्री ही दर चार महिन्यांनी रक्तदान करू शकतात. रक्तदानाने आपण दुसर्‍याचे आयुष्य तर वाचवतोच, पण त्याचबरोबर आपल्या शरीरामध्ये नवीन रक्तपेशी निर्माण होतात, आपण ताजेतवाने होतो. रक्तामधील लाल रक्तपेशी, प्लेटलेट्‌स व प्लाझमा हा प्रत्येक रुग्णाच्या गरजेनुसार वापरला जातो.

रक्तदान करण्याअगोदर रक्तदान करू इच्छिणार्‍यांच्या रक्ताची चाचणी केली जाते. याद्वारे एचआयव्ही, हिपॅटायटीस बी, सी, सिफिलीस या रोगांची लागण आहे का हे तपासले जाते. त्यावरूनच मग ती व्यक्ती रक्तदान करू शकते किंवा नाही हे ठरवले जाते.

काही लोकांना रक्तदान केल्यानंतर थोडा थकवा येणे, भोवळ येणे, उलटी आल्यासारखे वाटणे अशा तक्रारी उद्भवू शकतात ज्या स्वाभाविक आहेत व ही लक्षणे २४ तासात ठीक होतात. त्यामुळे रक्तदान केल्यानंतर भरपूर द्रव आहार घेणे आणि पौष्टीक व संतुलित आहार सेवन करणे आवश्यक असते.
कार्ल लँडस्टेनरने अ,इ,ज गटांचा शोध लावल्यामुळे त्यांना नोबेल पारितोषिक देण्यात आले. आता प्रत्येक वेळेला जेव्हा रक्त देण्यात येते तेव्हा रक्तदात्याचा रक्तगट जाणून घेऊन ते ज्या रुग्णाला द्यायचे आहे त्याच्या रक्ताशी जुळवून (क्रॉस मॅच करून) पाहिले जाते नव्हे यावर भर देण्यात येतो. दान केलेले रक्त हे ज्या रुग्णाला देण्यात येणार आहे त्याच्या रक्तात मिसळण्यायोग्य म्हणजेच अनुरूप असले पाहिजे. शिवाय त्या रुग्णाचा रक्तगट व त्याचा ठह (आरएच) स्टेटस बघूनच मग क्रॉस मॅचिंग केले जाते. या क्रॉस मॅचिंगमुळे रक्तदात्याच्या लाल पेशी या रक्त घेणार्‍या रुग्णाच्या सीरममध्ये प्रत्यक्ष मिसळून पाहिल्या जातात.

रक्तदान आणि अन्नदान हे सगळ्या दानांत श्रेष्ठ दान आहे. रक्त देणे ही एक अत्युत्तम भेट आहे जी कुणीही दुसर्‍याला देऊ शकतो. ती जीवनाची भेट आहे. म्हणूनच लक्षात ठेवा – ‘‘रक्त द्या, आयुष्य वाचवा’’!