येत्या पाच दिवसांत राज्यात गडगडाटासह पावसाची शक्यता

0
106

राज्यात पुढील पाच दिवसांत गडगडाटासह पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. उत्तर व दक्षिण गोव्यात पुढील पाच दिवस काही ठिकाणी गडगडाटसह पाऊस पडण्याची शक्यता असून वाराही जोरात वाहणार आहे असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. केरळमध्ये ३१ मेपासून मान्सून सुरू होण्याची शक्यता असून गोव्यात ४ जूनला मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.