बारावीच्या परीक्षेबाबत अद्याप निर्णय नाही ः मुख्यमंत्री

0
101

दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतलेल्या गोवा सरकारने अद्याप बारावीच्या परीक्षेबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

बारावीच्या परीक्षेबाबत काल बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, या परीक्षेबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.
यापूर्वी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी, २६ किंवा २७ मेपर्यंत सरकार इयत्ता बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे २६ रोजीपासून बारावीचे विद्यार्थी आणि पालक सरकारच्या निर्णयाच्या प्रतिक्षेत आहेत. मात्र काल मुख्यमंत्र्यांनी या परीक्षेबाबत कोणताही निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले.

राज्य सरकार कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर बारावी इयत्तेच्या परीक्षेबाबत कोणता निर्णय घेते याकडे बारावीच्या विद्यार्थ्यांसोबत सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.