युपीतील प्रयागराजमध्ये बॉम्बस्फोट, एकाचा मृत्यू

0
9

उत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान काल प्रयागराजमधील करेली येथे एका मतदान केंद्रापासून अवघ्या १० मीटर अंतरावर बॉम्बस्ङ्गोट झाला. यात एक तरुण जागीच ठार झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून याप्रकरणी तपास करण्यात येत आहे. सायकलला लावलेल्या पिशवीत ही स्ङ्गोटके ठेवण्यात आली होती. ही पिशवी खाली पडल्याने स्ङ्गोट झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. संजय कोल आणि त्याचा चुलत भाऊ अर्जुन कोल हे दोघे या सायकलवर होते. स्ङ्गोटात अर्जुन हा जागीच ठार झाला तर संजय हा किरकोळ जखमी आहे.